सक्तीच्या लसीकरण विरोधात खंडपीठात याचिका दाखल

High court

औरंगाबाद – जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पावले उचलायला सुरुवात केली आहे. लस घेतल्याचे प्रमाणपत्र नसलेल्या नागरिकांना पेट्रोल, रेशन, औषधी आदी सुविधा मिळण्यास मज्जाव केला आहे. आता तर रिक्षा आणि खासगी बसमध्येही लसीकरण नसलेल्या नागरिकांना प्रवास करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण आवश्यक … Read more

दिलासादायक ! शहरात 628 दिवसांनंतर कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

औरंगाबाद – एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनशी झुंजण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोना महामारी सुरू झाल्यापासून तब्बल 628 दिवसानंतर पहिल्यांदाच शहरात कोरोनाची रुग्ण वाढ खुंटलेल्याचे दिसून आले. काल शहरात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नाही तसेच जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. यामुळे जिल्हावासीयांना मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळाला आहे. काल जिल्ह्यात गंगापूर मध्ये एक तर वैजापूर … Read more

म्हसवडच्या सिध्दनाथाची रथयात्रा रद्द : RT-PCR, लसीकरण कागदपत्रे तपासली जाणार

म्हसवड | राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड येथील सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची येत्या रविवारी दि. 5 डिसेंबर रोजी होणारी रथयात्रा प्रशासनाने अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बॅरिकेंटिंग केलेल्या रथाचे लांबूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून केवळ लसीकरण झालेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. गुरुवारी प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबतचा … Read more

लसीकरणाला गती ! औरंगाबाद तालुक्यातील 30 गावांत 100 टक्के लसीकरण

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठीचे नियम अधिक कठोर केल्याने विविध गावांमधील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूच्या चिंतेने अवघ्या जगाची चिंता वाढवली असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात मात्र यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगलाच वेग मिळाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात औरंगाबाद तालुका आघाडीवर असून सर्वाधिक 30 गावांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे … Read more

मनपाचे लसीकरण टार्गेट पूर्ण; आता ‘इतके’ शहरवासी झाले लसवंत

औरंगाबाद – जिल्हा प्रशासनाने कडक नियमावली केल्याने काही दिवसातच औरंगाबाद महापालिकेने दिलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे टार्गेट पूर्ण केले आहे. राज्य सरकारने शहराला लसीकरणासाठी 10 लाख 32 हजार 174 एवढे टार्गेट दिले होते. मात्र , पालिकेने याही पुढे जाऊन 11 लाख 57 हजार 726 नागरिकांचे लसीकरण केले आहे. त्यामुळे आजघडीला शहरात 112.16 टक्के लसीकरण झाले आहे. … Read more

लसीकरणात जिल्ह्याची भरारी; काल एका दिवसात विक्रमी लसीकरण

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आगळ्यावेगळे आदेश काढून लसीकरण वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे लसीकरण मोहिमेला जिल्ह्यातील गावागावातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून काल दिवसभरात 47 हजार 799 नागरिकांनी लस घेतली. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी राज्यात 31 व्या क्रमांकावर असलेला जिल्हा थेट 18 व्या स्थानी पोहोचल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे … Read more

…तर रिक्षा होणार जप्त; सोमवारपासून होणार कारवाई

औरंगाबाद – कोरोना लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. अशातच लसीचा एकही डोस न घेणाऱ्या रिक्षाचालकांवर सोमवारपासून दंडासह वाहन जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत. तसेच लसीचा किमान एक डोस घेणाऱ्यांनाच खासगी बस चालकांनी तिकीट घ्यावे असे आदेश काढण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन दिवसागणिक नवनवीन आदेश … Read more

आता पेट्रोल पंपावर कारवाई होणार नाही

pp

औरंगाबाद – लस घेतल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीत पेट्रोल पंपाच्या विरोधात कारवाई करण्यात येणार नाही, अशी हमी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी खंडपीठात दिली. पुढील सुनावणी मंगळवारी (ता. 30) ठेवण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी लस घेतल्याशिवाय पेट्रोल देऊ नये असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या … Read more

बंधने येताच दहा टक्क्यांनी वाढले ‘लसवंत’

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश शासन वारंवार देत आहे. औरंगाबाद जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार 10 टक्क्यांनी लसीकरण वाढले असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी … Read more

औरंगाबादेत उद्यापासून ‘या’ वेळेतच मिळणार पेट्रोल- डिझेल

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात उद्यापासून पेट्रोलपंप सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचे पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने आज जाहीर केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या ‘नो लस,नो पेट्रोल’ या मोहिमेला संपूर्ण सहकार्य करत असल्याने मनुष्य बळाच्या तुटवड्यातून हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे डीलर्स असोसिएशनच्या अखिल अब्बास यांनी कळवले आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण … Read more