वाठारच्या महिला पाठोपाठ पुरूषही म्हणतायत : गावात नको बार, नको देशी- विदेशी की वाईन शाॅपी

Vathar Alcohol Gramsabha

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वाठार येथे काल महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आज पुरूषांचीही ग्रामसभा पार पडली. या सभेत देशी- विदेशी दारू, वाईन शाॅप आणि बियर बार दुकान यांना परवानगी देण्यावर चर्चा करण्यात आली. या विषयाला महिला पाठोपाठ पुरूषांनीही एकमुखाने हातवर करून विरोध दर्शविला आहे. यापुढे गावात नको बार, नको … Read more

राज्य सरकारकडून मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी वाईन विक्रीचा निर्णय; अमृता फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. वाईन हि दारूच आहे. दुकानात वाईन ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा … Read more

देशमुखनगर येथील अवैध दारू प्रकरणी कराडच्या प्रणव वाईन शाॅपच्या एकासह दोघांवर गुन्हा

सातारा | सातारा तालुक्यातील देशमुखनगर येथे मुख्य चौकात बिगर परवाना 13 देशी दारू बॉक्सची वाहतूक करणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. संशयिताने कराडजवळील पाचवड फाटा येथील प्रणव वाईन शॉप मधून दारूसाठा आणल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर गुलाब मुलाणी (रा. देशमुखनगर, ता. सातारा) व कराड येथील वाईन शॉपच्या उमेश … Read more

तळीराम-मद्यविक्रेत्यांसाठी गुड न्यूज! पर्यटनस्थळं, महामार्गालगतची दारुची दुकानं पुन्हा होणार सुरू; सरकारचा मोठा निर्णय

liquor shop

मुंबई । कोरोना संकटामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार २०१६ पासून विविध निर्बंधांमुळे बंद असलेली मद्याची दुकाने (Wine shops) पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत: पर्यटन स्थळे आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गांलगत असणाऱ्या मद्याच्या दुकानांचा समावेश आहे. (Maharashtra government lifts ban on Alcohol and wine … Read more

राज्यात दारुची दुकानं सुरु असताना, जिम बंद ठेवल्या जातात ही बाब दुर्दैवी – फडणवीस

मुंबई । दारूची दुकानं उघडली आणि जिम बंद आहेत हे दुर्दैवी आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी व्यायामशाळा उघडण्यास परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं पत्राद्वारे केली आहे. याशिवाय हळूहळू राज्यातील सर्वच क्षेत्रांचा विचार करुन अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्या-त्या क्षेत्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वं तयार करुन ती क्षेत्रं खुली करायला हवीत, अशीही मागणी या पत्रातून करण्यात … Read more

आता मुंबईतही दारू मिळणार घरपोच; महापालिका आयुक्तांच्या सूचना

मुंबई । संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल करून समाजजीवन पुन्हा सुरळीत सुरु करण्याचे प्रयत्न सरकार कडून केले जात आहेत. २ संचारबंदीनंतर सरकारने काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. यामध्ये वाईन शॉप चाही समावेश होता. मात्र वाईन शॉप वर लोकांनी अव्वाच्या सव्वा गर्दी केल्याने शासनाने हा निर्णय मागे घेतला होता. आता चौथ्या संचारबंदीनंतर पुन्हा एकदा हा मुद्दा … Read more

राज्यात ‘या’ तारखेपासून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी

मुंबई । राज्यात दारुविक्री सुरु असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये १४ मेपासून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबईसह दारुविक्री बंद असलेल्या ठिकाणीदारूची होम डिलिव्हरी मिळणार नाही. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यात दारुविक्री सुरु आहे तिथे रांगेत उभे राहण्यासोबत दारू घरपोचही केली जाईल. दारूची होम डिलिव्हरी कशी करायची याचे नियोजन वाईन शॉप्सनी … Read more

नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडणं हे दुर्दैव; अण्णा हजारेंची सरकारवर टीका

अहमदनगर । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आधी केंद्रनं आणि नंतर राज्य सरकारनं दारूची दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला आहे. सरकार नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडून देत आहे हे दुर्दैव आहे,’ अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अद्याप बरीच कामे करणे … Read more

तळीराम पावले! ३ दिवसांत १०० कोटींहून अधिक महसूल गोळा

मुंबई । केंद्र सरकारने ४ मेपासून कन्टेंन्मेंट झोन वगळता इतर भागात अटी-शर्तींसह दारु विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. महाराष्ट्रातही दारुची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची एकच झुंबड उडाली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली. तळीरामांच्या या … Read more

राज्यात मागील २४ तासात ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या दारूचा खप

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी तळीरामांची दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. तळीरामांच्या या दारूवेडामुळे दारू विक्रीच्या आकड्यांनी उचांक गाठला आहे. महाराष्ट्रात दारूविक्री करणाऱ्या दुकानांची संख्या … Read more