मधाच्या शोधात ‘तो’ झाडावर चढला, वर गेल्यावर घडलं असं काही…; 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातीलआकले गावात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या गावातील 30 वर्षीय तरुणाचा चिंचेच्या झाडावर असलेलया मधाचे पोळ काढताना फांदीवरून पाय घसरून मृत्यू झाला आहे. सुरज वामन काटकर (वय 30, रा. आकले, ता. जि. सातारा) असे झाडावरून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आकले गावातील … Read more

घृणास्पद : युवकावर अनोळखी दोन इसमाकडून अनैसर्गिक अत्याचार

सातारा | खटाव तालुक्यातील विखळे फाटा येथील एका शिवारात एका युवकाला बळजबरीने मारहाण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पिडीत युवक हा द्राक्ष बागायतदार कामगार असून संशयित दोघे सांगली जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणात राहुल रामचंद्र शिंदे व प्रशांत संभाजी निकम (दोघे रा. नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) या दोघांना वडूज पोलिसांनी … Read more

कोरोनामुळे सैन्य भरती नाही, त्यामुळे युवकांना वयोमर्यादेत सवलत द्या : खा. श्रीनिवास पाटील

कराड | सैन्यदलात जाण्यासाठी अनेक तरूणांनी भरतीपूर्व तयारी केली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दोन वर्षापासून सैन्य भरती प्रक्रिया बंद आहे. कोरोना संकटाचे सावट कमी होत असल्यामुळे केंद्र सरकारने सैन्य भरती मेळावे घेऊन देशसेवा करण्यासाठी इच्छुक असणा-या तरूणांना दिलासा द्यावा. तसेच भरती अभावी संधी गमावलेल्या युवकांना खासबाब म्हणून वयोमर्यादेत सवलत द्यावी, अशी अग्रणी मागणी खा. … Read more

जिल्हा हादरला : एकाच दिवसात 5 जणांची आत्महत्या

sucide

सातारा | जिल्ह्यातील विविध भागात एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या करणाऱ्यात वयाची चाळीशी पार केलेले एकाचाही समावेश नाही. त्यामुळे ऐन तारूण्यात टोकाचे पाऊल तरूण दिसत आहेत. समाजात अत्यंत चितेंचा विषय बनत असलेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील विविध भागातील पाच जणांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केल्याने … Read more

@151 रक्तदाते : शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर काैतुकास्पद : शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तांबवे येथे जिल्हा परिषद सदस्य प्रदीपदादा मित्र परिवाराच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रविवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात 151 तरुणांसह महिला व युवतींनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व युवा नेते जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील,  पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, गटविकास अधिकारी … Read more

मोबाईलच्या अतिवापरामुळे कसे होते मानसिकतेवर परिणाम

विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. रविंद्र शिंदे म्हणाले की या लॉकडाऊन मध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या पूर्णवेळ सर्वजण घरातच असल्यामुळे व ऑनलाइन शिक्षणामुळ विध्यार्थी मोबाईलचा अतिवापर करीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक व मानसिक परिणाम होतांना दिसत आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोणातून विचार केला तर मुलांमध्ये चिडचिडेपणा … Read more

भटक्या कुत्र्यावर तलवारीने हल्ला, तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

crime

सांगली | सांगलीतल्या संजयनगर परिसरातील झेंडा चौक येथे भटकी कुत्री त्रास देत असल्याच्या कारणातून तरुणाने तालवारीनेच चक्क कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केले. या परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास हि बाब आली. सदरची घटना १ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिन्मय पार्क रोडवरील सोनार मळा समोर घडली. या प्रकरणी पोलीस शिपाई मोहन माळी यांनी … Read more

फलटण मधील कोरोना बाधितांच्या स्मशानभूमीतील युवकांचे पुर्नवसन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके फलटण तालुक्यातील कोळकी येथील स्मशानभूमीत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर एक तरुण काहीतरी खात असल्याचा व्हिडिअो व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या तरूणाला तेथून हाकलून लावत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज त्याचे पूनर्वसन वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन संस्थेत करण्यात आले. कोरोना रुग्णाचे मृतदेह जाळण्यासाठी कोळकी ग्रांमपंचायतची संमाशानभूमी घेतली आहे. या स्माशानभूमीत तरुण … Read more

शाब्बास हो ः कोरोनाला हरविण्यासाठी 72 तासांत 2 लाख 70 हजार रूपये जमा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन लिंब गावातील ग्रामस्थांनी अनोखा आदर्श समाजासाठी निर्माण केला आहे. मोबाईलवरील व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लिंब मधील नोकरी निमित्त बाहेर असणाऱ्या देशातील व परदेशातील नोकरदार युवकांनी तसेच ग्रामस्थांनी एकत्र आले आहेत. लिंब परिसरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या पाहून प्राथमिक आरोग्य केंद्रात कमतरता असणारी औषधे उपलब्ध … Read more

संचारबंदीच्या काळात विकले तब्बल २० टन अंजीर; अभियंता तरुणाने केली १३ लाखांची कमाई

पुणे । संचारबंदीच्या काळात इतरांसोबत शेतकरीही आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकाची विक्री झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. या परिस्थीतीवर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर येथील समीर डोंबे या अभियंता तरुणाने मात केली आहे. बी ई मेकॅनिकल पदवीधर असणाऱ्या समीरने अंजिर शेतीत प्रयोग केला आहे. यात त्याला यशही मिळाले … Read more