ताज महालचं नाव बदलून राम महाल होणार ; भाजप आमदाराचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील ७ आश्चर्यांपैकी एक असलेलं, प्रेमाचं प्रतीक मानलं जाणाऱ्या ताज महालचं लवकरच नामांतर राम महल होईल, असा दावा भाजप आमदाराने केला आहे. उत्तर प्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंह म्हणाले की, आग्राचे ताजमहाल हे शिवकालीन मंदिर होते आणि योगी प्रशासनात लवकरच त्याचे नाव राममहाल असे ठेवण्यात येईलसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केले.”छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उत्तर प्रदेशच्या भूमीत दाखल झाले आहेत. समर्थ गुरु रामदासांनी ज्याप्रमाणे शिवाजींना भारताला दिले त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशला दिले आहे,” असे सिंह म्हणाले.

दोनच दिवसांपूर्वी आग्रातील ताज महाल परिसरात हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी येथील लोकांना प्रार्थना म्हणायला लावली होती. याप्रकरणात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे प्रकरण ताजं असताना भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारानं खळबळजनक दावा केला आहे. लवकरत ताज महालाचं नामकरण राम महाल करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment