…तर तुझे ‘तसले’ फोटो व्हायरल करु; ‘टकाटक’मधील ‘या’ अभिनेत्रीला धमकीचा फोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध अशा मराठी चित्रपट ‘टकाटक’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमवला. या चित्रपटात प्रथमेश परब, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. याच चित्रपटातील एका अभिनेत्रीबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्री कोमल बोडखे हिने एक व्हिडीओ शेअर करत त्याची माहिती दिली आहे.

‘टकाटक’मधील अभिनेत्री कोमल बोडखे ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने सायबर क्राईमची शिकार झाल्याचे सांगितले आहे. इतकंच नव्हे तर तिला काही नंबरवरुन तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली जात आहे. याबद्दल कोमलने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओत कोमलने म्हंटल आहे की, गेल्या काही दिवसांपासून मला एका नंबरवरून फोन येत होते. पण अनोळखी नंबर असल्याने मी तो फोन उचलला नाही. त्यानंतर मग त्यांनी माझ्या भावाला फोन केला. मला माझ्या भावाने मला फोन करून विचारलं की तू कोणत्या अँपवरून पैसे घेतले आहेस का? मी त्याला नाही असं म्हटलं. त्यावर तो म्हणाला की ते लोक तू घेतलेल्या पैशाची मागणी करत आहेत. तसेच ते व्याजही मागत आहे.

https://www.instagram.com/p/Clsj7CPjkqS/

यावेळी सुरुवातीला मी घाबरले. मग मी त्या नंबरवर फोन केला आणि कोणतंही कर्ज घेतलं नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी मला माझ्या आधारकार्डचे डिटेल पाठवले. तसेच जर पैसे भरले नाहीत तर तुमचे न्यूड फोटो व्हायरल करु अशी धमकी दिली. मग मात्र मी आणखी घाबरले. मी माझ्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. त्यांनी मला अकाउंट चेक करायला सांगितलं. मी चेक केल्यावर माझ्या एका खात्यात २ हजार पेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आल्याचं मला कळालं. शेवटी मी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.