“माझ्या आईची काळजी घ्या !” असा मेसेज पाठवत तरुण व्यावसायिकाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धायरी : हॅलो महाराष्ट्र – चंद्रशेखर गोपाळ पुजारी या तरुण व्यावसायिकाने आज सकाळी खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या केली आहे. तसेच या व्यावसायिकाने आत्महत्येच्या अगोदर “माझी गाडी खडकवासला धरणाजवळ लावलेली आहे. मी आत्महत्या करत असून गाडी विकून जे पैसे येतील ते माझ्या आईला द्या,” तसेच ‘माझ्या आईची काळजी घ्या’, असा व्हॉइस मेसेज आपल्या चुलत भावाला पाठवून आत्महत्या केली आहे.

चंद्रशेखर याने पुणे-पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी १० वाजता या तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. या नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे- पाटील, पोलीस हवालदार रामदास बाबर, दिलीप गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

सोमवार पेठ येथे चंद्रशेखर हातगाडीवर वडापाव व डोसा विक्रीचा व्यवसाय होता. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या तरुणाने खडकवासला धरणाजवळून चुलत भावाला व्हॉईस मेसेज केला. त्यानंतर चुलत भाऊ व नातेवाईकांनी तातडीने खडकवासला येथे येऊन शोधाशोध केली तेव्हा त्यांना चंद्रशेखर पुजारी याची दुचाकी आढळली होती. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्यात चंद्रशेखर हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. चंद्रशेखर याने कशामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही.

Leave a Comment