मोबाईलमध्ये तसले फोटो बाळगणे गुन्हा होऊ शकत नाही – उच्च न्यायालय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिरुअनंतपुरम | मोबाईलमध्ये फोटो बाळगणे स्त्री प्रतिबंधक निषेध कायद्यांतर्गत गुन्हा होऊ शकत नाही असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अश्लील फोटो बाळगणे आणि विकणे कायद्याने गुन्हा आहे असे त्या महिलेने आपल्या दाखल केलेल्या याचिकेत म्हणले होते मात्र न्यायालयाने हि याचिका फेटाळून लावली आहे.

राष्ट्रवादी वर्धापन दिन : नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार – शरद पवार

न्यायमूर्ती विजय राघवन यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, जर एखाद्या तरुणाकडे अश्लील फोटो असल्यास लागलीच त्याला 1968 मधील कलम 60 लागू होत नाही. जर त्यानं त्या फोटोंचा इतर कोणत्याही उद्देशासाठी किंवा जाहिरातीसाठी दुरुपयोग केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकतो. 2008मध्ये या प्रकरणात याचिका दाखल केली होती. त्यानंतर तो निकाल राखून ठेवण्यात आला होता.

शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक

त्यादरम्यान पोलिसांनी कोल्लम बस स्थानकावर तपास मोहीम राबवली असता, दोन जणांकडे बॅग आढळली, त्यांच्याकडे दोन कॅमेरेसुद्धा होते. त्या व्यक्तींकडे अश्लील फोटो आणि व्हिडीओ असल्याचंही तपासात उघड झालं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली अन् कॅमेरे जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी कोल्लम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अंतिम रिपोर्ट सोपवला.

Leave a Comment