कोण आदित्य ठाकरे..? तो केवळ एक आमदार; तानाजी सावंत यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोण आदित्य ठाकरे? तो एक आमदार आहे. आता सर्व शक्ती निघून गेल्यावर शक्तीप्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे? असा सवाल करत सावंतांनी टिका केली केले.

तानाजी सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आदित्य ठाकरे हे शक्ती प्रदर्शन करत आहेत. मात्र, शक्ती गेल्यानंतर शक्तीप्रदर्शन करुन काय उपयोग? सर्व शिवसैनिक हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे आता काही फरक पडणार नाही. आणि ते आहेत तरी कोण? एका आमदाराशिवाय आता त्यांच्याकडे कोणते पद आहे, असे सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. अशात आदित्य ठाकरे यांचीही पुण्यात सभा होत आहे. आज मुख्यमंत्री शिंदे व आ. ठाकरे दोघेही असणार असल्याने या याठिकाणी घडणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागलेत आहे. याच पार्श्वभूमीवर आ. सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.