मुंबई- अजय देवगणचा तान्हाजीः द अनसंग वॉरिअर सिनेमाला महाराष्ट्र सरकारने राज्यात करमुक्त म्हणून घोषीत केले आहे. याआधी तान्हाजी सिनेमा उत्तरप्रदेश आणि हरियाणामध्ये करमुक्त करण्यात आला होता. वर्षाच्या सुरुवातीला १० जानेवारीला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित झाला होता. १३० कोटींच्या बजेटच्या या सिनेमाने आतापर्यंत १८० कोटींहून अधिकची कमाई केली आहे.
Maharashtra Government makes film ‘Tanhaji’ tax-free in the state. pic.twitter.com/l3DttfvXJW
— ANI (@ANI) January 22, 2020
लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये होईल समावेश-
अजय देवगणच्या करिअरमधील हा १०० वा सिनेमा आहे. याशिवाय अजयचा हा दुसरा सिनेमा आहे जो २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल. याआधी रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल अगेन या सिनेमाने २०० कोटींहून अधिकचा गल्ला कमावला होता. सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सिनेमाच्या कलेक्शनची अधिक माहिती दिली.