टाटा आणि अजय सिंग यांनी एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी लावली बोली, मुदत काल संपली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कर्जात बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी दोन कंपन्यांनी बोली लावली आहे. कंपनीसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये स्पाइसजेटचे प्रमोटर अजय सिंह आणि टाटा ग्रुप यांचा समावेश आहे. एअर इंडियासाठी बोली लावण्याची काल शेवटची तारीख होती.

टाटा सन्सच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले की,” त्याने विमान कंपनीसाठी बोली लावली आहे. टाटा समूहाने आधीच दोन विमान कंपन्यांमध्ये भाग घेतला आहे. यामध्ये एअर एशिया इंडियाचा समावेश आहे. ही कमी किमतीची विमानसेवा आहे तर इतर पूर्ण सेवा देणारी विमान सेवा विस्तारा आहे.”

एअर इंडियावर प्रचंड कर्ज आहे
एअर इंडियावर खूप मोठे कर्ज आहे. हे सुमारे 43,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी 22,000 कोटी रुपये एअर इंडिया एसेट होल्डिंग लिमिटेड (AIAHL) ला हस्तांतरित केले जातील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमान कंपनीचे कर्ज 43,000 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे आणि ही सर्व कर्जे सरकारी हमी अंतर्गत आहेत. जेव्हा जव्हा सरकार ते नवीन मालकाला देईल तेव्हा सरकार हे कर्ज फेडेल.

100% भागभांडवल विकण्याची तयारी
विशेष म्हणजे, केंद्र सरकार एअर इंडिया आणि त्याची कमी किमतीची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसमधील शंभर टक्के हिस्सा विकण्याची तयारी करत आहे. याशिवाय, ग्राउंड होल्डिंग कंपनी एअर इंडिया SATS एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (AISATS) मधील 50 टक्के भागविक्री करणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील एअर इंडियाची इमारत, दिल्लीतील एअरलाइन्स हाऊससह इतर मालमत्तांचाही या विक्रीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment