.. म्हणून भारतातील आघाडीची आयटी कंपनी TCSला बसला तब्बल २ हजार १०० कोटींचा दंड

वॉशिंग्टन । टाटा समूहातील आघाडीची टाटा कंसल्टसी सर्व्हिसेस (TCS) कंपनीला अमेरिकेतील कोर्टाने २ हजार १०० कोटींचा दंड केला आहे. अमेरिकेतील एका फेडरल अपिलिय कोर्टाने हा दंड ठोठावला आहे. TCSवर अमेरिकेतील Epic systems या कंपनीने चोरीचा आरोप केला होता. TCSने दिलेल्या माहितीनुसार ते अन्य पर्याय शोधत आहेत. त्यांच्या मते Epic systems कडे बैद्धिक संपदेच्या दुरुउपयोग केल्याचा कोणताही पुरावा नाही. Epic systems ने TSCवर बैद्धिक संपदेची चोरी करून एक प्रॉडक्ट तयार केल्याचा आरोप केला होता.

कोर्टाने TCSला ट्रेड सिक्रेट चोरी प्रकरणी हा दंड केला आहे. विशेष म्हणजे कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हा दंड केलाय. याआधी कनिष्ठ न्यायालयान केलेल्या दंडाविरुद्ध TCSने फेडरल कोर्टात याचिका केली होती. कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेला दंड अधिक TCSने म्हटले होते. TCSने शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या एका माहिती ही गोष्ट सांगितली. या प्रकरणी कोर्टाने TCSला आधी ९४० मिलियन डॉलर इतका दंड केला होता. २०१६ मध्ये तो ४२० डॉलर इतका केला. या निर्णयाच्या विरुद्ध TCSने अमेरिकेच्या फेडरल कोर्टात याचिका दाखल केली होती.

अमेरिकेतील हेल्थकेअर सॉफ्टवेअर निर्मिती करणाऱ्या Epic systemsने TCSवर २८ कोटी डॉलर म्हणजे जवळपास २ हजार १०० कोटीचा दावा दाखल केला होता. पण TCSने ही फेटाळून लावली आहे. या प्रकरणी सेबीने मे महिन्यातच टीसीएसला सावध केले होते की, या प्रकरणाची माहिती गुंतवणूकदारांना दिली जावी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like