व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून आरोपीने शिक्षिकेसोबत केले ‘हे’ कृत्य

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपींनी एका 21 वर्षीय शिक्षिकेवर बलात्कार केला आहे. वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने बोलावून पीडित शिक्षिकेवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल करताच नवी मुंबईच्या क्राईम ब्रांच टीमने तातडीने कारवाई करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडित शिक्षिका ही गुजरातमधील असल्याचे समजत आहे. अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपींची नावे अयूब इदरीस खान आणि शाहबाज जहीर अली अशी आहेत.

सोशल मीडियावर झाली होती मैत्री
पीडित महिला ही मागच्या पाच महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून खान याच्या संपर्कात होती. त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. दोघेही व्हॉट्सअपवर एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. मात्र हे दोघे एकमेकांना कधी भेटले नव्हते. यानंतर अयूब खान याने शिक्षिकेला आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावले. यानंतर घटनेच्या दिवशी पीडित महिला ही गुजरातहून वांद्रे रेल्वे स्थानकात पोहोचली. यानंतर आरोपी अयूब खान पीडित महिलेला घेऊन नवी मुंबईतील तळोजा या ठिकाणी गेला.

दारू पाजून बलात्कार
आरोपी अयूब खान हा मुंबईतील सायन परिसरात राहणारा आहे तर त्याचा मित्र शाहबाज अली हा तळोजामध्ये राहतो. यानंतर अयूब इदरीस खान याने पीडित शिक्षिकेला एका फ्लॅटवर नेले आणि तिला बिअर पाजली. यानंतर आरोपीने खान याने शिक्षिकेवर बलात्कार केला तर दुसरा आरोपी अली याने शिक्षिकेसोबत छेडछाड केली. यानंतर पीडित महिलेने आरोपींच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका केली आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. यानंतर पीडित महिलेने पोलीस कंट्रोल रूमला फोन करून आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. पीडित महिलेकडे आरोपीचा फोन नंबर आणि फोटो होता त्या आधारावर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

शहर सोडण्याच्या तयारीत होते आरोपी
आरोपींचा फोन नंबर मिळताच पोलिसांनी आरोपींचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली तेव्हा ते खूपच वेगाने पुढे जाताना दिसून आले. त्यामुळे आरोपी हे ट्रेनमधून प्रवास करत असावेत असा अंदाज आला. त्यानंतर पोलिसांची टीम लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने रवाना झाली. यानंतर पोलीस एलटीटी येथे ट्रेनमध्ये शिरले आणि आरोपींचा घेऊ लागले. यानंतर पोलिसांनी आरोपींना एक डब्यातून अटक केली. हे आरोपी मध्यप्रदेश येथील असून आपल्या घरी पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.