धक्कादायक ! नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार

जोधपूर : वृत्तसंस्था – जोधपूरमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जोधपूरमधील एका शाळेत चक्क शिक्षक विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करत होता. तसेच याबद्दल जर कोणाला काही बोलशील तर तर नापास करेन अशी धमकीसुद्धा या शिक्षकाने विद्यार्थिनीला दिली होती. वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आल्याने ही मुलगी गर्भवती राहिली होती यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला.

मुलीची तब्येत बिघडल्याने तिच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले होते. यावेळी डॉक्टरांनी मुलीला तपासले असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. यानंतर मुलीच्या कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियाने मुलीला याबाबत विचारले असता तिने रडत रडत दोन शिक्षकांनी केलेले सांगितले. मुलीने आपली नावे घेतल्याचे समजल्यावर हे दोनही शिक्षक फरार झाले आहेत. पोलिसांनी या दोन्ही शिक्षकांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे.

जोधपूरमधील बालेसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातल्या शाळेत हा सगळा प्रकार घडला आहे. या ठिकाणच्या शासकीय शाळेत ही मुलगी शिकत होती. या शाळेतील शिक्षक सुरजाराम याने विद्यार्थिनीवर मार्च महिन्यात शाळेतमध्येच 3-4 वेळा बलात्कार केला होता.सुरजाराम हे काम करत असताना त्याचा साथीदार सहीराम हा खोलीबाहेर उभा राहून पहारा द्यायचा. पीडीत मुलीने हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

You might also like