Thursday, February 2, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना डच्चू

- Advertisement -

ऍडिलेड । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Tour Australia 2020-21) यांच्यातील कसोटी मालिका उद्यापासून (17 डिसेंबर) खेळण्यात येणार आहे. हा कसोटी सामना डे-नाईट असून पिंक (गुलाबी) चेंडूने खेळण्यात येणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या अंतिम 11 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. Team India final 11 players announced for first Test against Australia in Adelaide

केएल-गिलला संधी नाही
पहिल्या या कसोटी सामन्यात केएल राहुलला आणि शुभमन गिलला संधी देण्यात आली नाही. या दोघांना संधी न दिल्याने या दोघांच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीची मदार उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असणार आहे. तर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अनुभवी आर आश्विनकडे असणार आहे.

- Advertisement -

ऋद्धीमान साहाला विकेटकीपर म्हणून संधी
ऋद्धीमान साहा याला पहिल्या कसोटी सामन्यात विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया ए विरोधातील सराव सामन्यात या दोघांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या दोघांकडून विकेटकीपर म्हणून दावेदारी सिद्ध करण्यात आली होती. मात्र टीम मॅनेजमेंटने पंतऐवजी ऋद्धीमान साहावर विश्वास दाखवला आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, आणि जसप्रीत बुमराह

कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – ऍडिलेड

दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा ऍडिलेड

तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी

चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’