IND Vs WI ODI : पाकिस्तानचा ‘तो’ विक्रम मोडण्याची टीम इंडियाला आहे संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने पहिली वनडे (IND Vs WI ODI) जिंकत सीरिजची चांगली सुरुवात केली आहे. तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताने पहिली वनडे जिंकून सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज दोन्ही संघांमध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. या सीरिजच्या (IND Vs WI ODI) सगळ्या मॅच पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियममध्ये होणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाला मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. जर आजचा सामना टीम इंडिया जिंकली तर एका टीमविरुद्ध लागोपाठ सर्वाधिक द्विपक्षीय वनडे सीरिज जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड टीम इंडिया आपल्या नावावर करू शकते.

भारत-पाकिस्तानची बरोबरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये (IND Vs WI ODI) टीम इंडियाचा विजय झाला तर ती सिरीज आपल्या नावावर करेलच. तसेच भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धचा हा लागोपाठ 12 वा वनडे सीरिजचा विजय असेल. असे झाले तर भारत एका टीमविरुद्ध सर्वाधिक वनडे सीरिज (IND Vs WI ODI) जिंकण्याचं रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकेल. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात या रेकॉर्डची बरोबरी आहे.

भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ 11 द्विपक्षीय वनडे सीरिज (IND Vs WI ODI) जिंकल्या आहेत. मे 2006 साली भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचं पराभूत व्हावं लागलं होतं. यानंतर जानेवारी 2007 पासून भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची एकही वनडे सीरिज (IND Vs WI ODI) हरलेली नाही. पाकिस्तानचा लागोपाठ 11 वनडे सीरिज जिंकण्याचा विक्रम कमजोर झिम्बाब्वेविरुद्ध आहे. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात 14 वनडे सीरिज झाल्या, यातल्या एकाही सीरिजमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला नाही. यामध्ये पहिल्या तीन सिरीज ड्रॉ झाल्या होत्या.

एका टीमविरुद्ध लागोपाठ वनडे सीरिज विजय
11 वेळा भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले. (2007 पासून आतापर्यंत)
11 वेळा पाकिस्ताननने झिम्बाब्वेला पराभूत केले. (1996 पासून आतापर्यंत)
10 वेळा पाकिस्तानने वेस्ट इंडिजला पराभूत केले. (1996 पासून आतापर्यंत)
9 वेळा दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेला पराभूत केले (1995 पासून आतापर्यंत)
9 वेळा भारताने श्रीलंकेला पराभूत केले. (2007 पासून आतापर्यंत)

हे पण वाचा :
तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!

ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य  

शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेंचं; फोटोंनी वेधलं लक्ष्य

Leave a Comment