Video स्व. गोपीनाथ मुंडेच्या आठवणीने छ. उदयनराजे यांच्या डोळ्यात अश्रू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खा. छ. उदयनराजे भोसले हे व्यक्तिमत्व नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी महाराज चर्चेत असते. कधी स्वतः सत्तेत असलेल्या पक्षावर तर कधी कोणावर नेम धरतील हे कुणालाच सांगता येत नाही. परंतु त्यासोबत एक भावनिक व प्रेमळ व्यक्ती म्हणूनही सातारकरांना छ. उदयनराजे हे माहित आहेत. सध्या छ. उदयनराजे यांचा एक भावनिक झालेला व डोळ्यात अश्रू तरळतांनाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे हे नेतृत्व सर्वच राजकीय पक्षातील जीवाभावाचे संबध होते. छ. उदयनराजे भोसले यांच्या राजकीय कारकिर्दीत गोपीनाथ मुंडे यांचे एक वेगळे स्थान असल्याचे ते स्वतः अनेकदा सांगतात. युती सरकारच्या काळात छ. उदयनराजे भोसले हे मंत्री होते. तेव्हा स्व. गोपीनाथ मुंडे आणि उदयनराजे भोसले यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. या काळात साताऱ्यातील एक खून प्रकरणाची केस सुरू असतानाही गोपीनाथ मुंडे यांनी छ. उदयनराजे यांना मोठी साथ दिली होती.

छ. उदयनराजे भोसले यांचा एक व्हिडिओ `धर्मवीर` चित्रपटातील गाण्यात “भेटला विठ्ठल” गाण्यावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये छ. उदयनराजे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोला अभिवादन केले, तर तेथून निघताना मुंडे साहेबांच्या आठवणीने भावनिक होत डोळ्यात अश्रू आल्याचे दिसून येत आहे. छ. उदयनराजे भोसले हे गोपीनाथ मुंडेंना आपले राजकारणातील गुरूच मानत होते.