इंधनदर वाढीनंतर आता फोन कॉल, इंटरनेट डेटाचे दरही वाढण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात सामन्यांवर इंधन दरवाढीचा बोजा पडला असताना आणखी एक बोजा त्यांच्यावर पडण्याची शक्यता आहे. पुढील 12 ते 18 महिन्यांमध्ये फोन कॉल आणि इंटरनेटसह सर्व सेवा-सुविधांचा वापर महाग होण्याची शक्यता आहे. कारण येत्या दीड वर्षात फोन कॉल-इंटरनेटसह सर्व सेवा-सुविधांचे दर २ वेळेस वाढवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दूरसंचार क्षेत्रातील सध्याची संरचना लाभदायक नाही. यामध्ये ऑपरेटरला योग्य परतावा मिळत नाही. त्यामुळे टेलिकॉम सेक्टरमधील शुल्कवाढ ‘अपरिहार्य’ आहे. परिणामी येत्या 12 ते 18 महिन्यात दोन वेळेस दरवाढ होऊ शकते, असे देशातील आघाडीची कन्सल्टन्सी EY इंडियाने म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत तातडीने दरवाढ होणार नाही, पण पुढील 12 ते 18 महिन्यात २ टप्प्यात ही वाढ केली जाऊ शकते. त्यातील पहिली दरवाढ येत्या सहा महिन्यांमध्येच होण्याची शक्यता आहे असे EY चे प्रशांत सिंघल यांनी सांगितले.

‘ही वाढ होईलच असे मी म्हणत नाही, पण बाजारात टिकून राहण्यासाठी 12 ते 18 महिन्यात दर वाढविण्याशिवाय टेलिकॉम कंपन्यांना पर्याय नाही. ही दरवाढ नियामक हस्तक्षेपाने होते की टेलिकॉम उद्योग स्वत: ही दरवाढ करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ दरवाढ केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment