मदिरालय सुरु मग देवालये बंद का ? म्हणत मनसेने मंदिरे उघडण्यासाठी केला घंटानाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर आज औरंगाबाद शहरात मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील गुलमंडित असलेल्या सुपारी हनुमान मंदिरासमोर हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मंदिरासमोर जमलेल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी घंटानाद करत आंदोलन केले. तसेच आंदोलनकर्त्यानी यावेळी मंदिरासमोर आरती देखील करण्यात आली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

यावेळी बोलताना मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले की, राज्यात आता सर्वत्र हाॅटेल, बार, राजकीय सभा, मेळावे, आंदोलन सुरु आहेत. त्याठिकाणी सरकराला गर्दी चालते मग हिंदु सण आणि मंदिर बंद का ? असा सवाल खांबेकर यांनी यावेळी सरकारला विचारला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सरकरा विरोधात ‘उद्धव ठाकरे हाय हाय, ये सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है’ अशा प्रकारे घोषाणाबाजी केली.

तसेच आंदोलनावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे म्हणाले, राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर हे आंदोलन करण्यात आले. दरवेळी हिंदु सण आले की, कोरोनाचा प्रसार होतो का ? असा सवाल दाशरथे यांनी उपस्थित केला. तसेच येत्या १५ दिवसांत राज्यातील मंदीर उघडण्याबाबत सरकारने जर निर्णय घेतला नाही तर मनसे अधिक तीव्र आंदोलन करले असा थेट इशारा मनसे महाविकास आघाडीला दिला आहे.

https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/369645294656873/

लवकरात लवकर मंदिरे उघडली नाही तर, गाठ मनसेशी आहे – सतनामसिंग गुलाटी
राज्यातील ठाकरे सरकार नियोजनशून्य सरकार असून, यांना कुठल्याही प्रकारचे नियोजन करता येत नाही. तसेच हे सरकार तालिबानीसारखे हिंदूंच्या सणांवर बंधने आणत आहे. सरकारला मदिरालय चालतात मग मंदिरे का नाही असा सवालही मनसेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांनी उपस्थित केला आहे. जर सरकारने आता लवकरात लवकर मंदिरे उघडली नाही तर गाठ आमच्याशी आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Leave a Comment