Tuesday, June 6, 2023

खोपोलीमध्ये बसचा भीषण अपघात, 10 जण जखमी

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – खोपोली परिसरातील सायरस टाटा पॉवर जवळ एका मिनी बसचा भीषण अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात (accident) 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या भीषण अपघातात (accident) कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातातील जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. या बसमध्ये एकूण 18 प्रवाशी प्रवास करत होते. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
कार्ला येथून हि अपघातग्रस्त बस निघाली होती. खोपीलीजवळ आल्यानंतर या बसचा ब्रेक फेल झाला. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे बस ड्रायव्हरला बस कंट्रोल झाली नाही आणि हा अपघात (accident) झाला. या बसमध्ये एकूण 18 प्रवासी होते, त्यापैकी 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या जखमींपैकी एक जण गंभीर झाला आहे. सुदैवाने या अपघातात (accident) कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती