SSC Result : राज्यात दहावीचा निकाल 96. 94 टक्के, कोकण विभाग आघाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वात जास्त निकाल लागला आहे.

http://mahresult.nic.in/

राज्यात 8 माध्यमांसाठी परिक्षा झाली. राज्यातील पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, आैरंगाबाद, लातूर, नाशिक व कोकण या  9 विभागातून 15 लाख 84 हजार 790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 68 हजार 977 परिक्षेला बसले होते. तर 15 लाख 21 हजार 003 उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णची टक्केवारी 96.94 अशी आहे.

http://sscresult.mkcl.org/

राज्यात कोकण विभागाचा निकाल 99. 27 टक्के लागला आहे. राज्यात मुलीचे उत्तीर्णची टक्केवारी 97. 96 तर मुलाची टक्केवारी 96. 06 आहे. त्यामुळे मुलींनी बाजी मारली आहे. राज्यातील 66 पैकी 24 विषयाचा निकाल 100 टक्के निकाल आहे. निकालात 6 लाख 50 हजार 779 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 5 लाख 70 हजार 027 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 2 लाख 58 हजार 027 विद्यार्थी तृतीय श्रेणीत तर 42 हजार 70 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. राज्यात 22 हजार 921 माध्यमिक शाळांतून 16 लाख 38 हजार 964 विद्यार्थी परिक्षेस होते. त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

https://ssc.mahresults.org.in/

Leave a Comment