अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार ते परतवाडा मार्गावर असलेल्या फ्रेंच कॉलनीमधील लोकवस्तीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये एका मोठ्या भंगारच्या गोडाऊनचे नुकसान झाले. भर लोकवस्तीमधील गोडाऊनला आग लागल्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हि घटना समोर येताच चांदुरबाजार नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाने हि आग नियंत्रणात आणली आहे. या आगीमध्ये गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
अमरावती येथे लागलेली आग. pic.twitter.com/EmF3nfwYFp
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 10, 2022
अशी घडली घटना
चांदुरबाजारच्या फ्रेंच कॉलनीत भंगाराची मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. ही दुकाने भर वस्तीत आहेत. या ठिकाणी खरेदी करून आणलेले भंगार ठेवले जाते. या ठिकाणी भंगाराच्या दुकानाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, आग मोठ्या प्रमाणात पसरली. यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तोपर्यंत या बरेच नुकसान झाले होते.
मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगाराचे साहित्य असल्याने ही आग जोराने पसरली. या आगीत भंगाराच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही आग पाहण्यासाठी लोकांनी बरीच गर्दी केली होती. पण, आग मोठी असल्याने ती विझवण्यात अडचण येत होती. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.