नवी मुंबईत गावगुंडांचा हैदोस, हॉकी स्टिकने केली बेदम मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – हल्लीच्या काळात पार्किंग हा लोकांचा चिंतेचा विषय बनला आहे. या पार्किंगवरून लोक एकमेकांवर प्राणघातक हल्ला करतात. अशीच एक घटना नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अंबिका नगर सोसायटीमध्ये घडली आहे. हि मारहाणीची घटना सोसायटीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. पार्किंगवरून सातत्याने वाद घालणाऱ्या गावगुंडांनी (terror of village goons) एका व्यक्तीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कुठे घडली घटना ?
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अंबिका नगर सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. दोघे गावगुंड (terror of village goons) वाहन पार्किंगवरून सातत्याने वाद घालत होते. स्थानिक रहिवाशांना ते वारंवार पार्किंगवरून धमकावत असायचे. याच वादातून त्यांनी एका रहिवाशाला बेदम मारहाण केली आहे. हि घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

त्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून गावगुंड (terror of village goons) त्या ठिकाणाहून फरार झाले आहेत. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गावगुंड हे अंबिका नगर सोसायटीतच राहणारे असून त्यांनीच ही मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हे पण वाचा :

दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद

मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर

कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात

नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?

जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे

Leave a Comment