मुंबई लोकलवर विषारी गॅस हल्ला करण्याचा कट? सुरक्षेत मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली पोलिसांनी 6 दहशतवाद्याना ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. मुंबई लोकलवर विषारी गॅसच्या साहाय्यानं हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागानं रेल्वे पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्याचं समजतं.

दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. यापूर्वी मुंबई लोकल अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी जे दहशतवादी पकडले आहेत त्यांनी मुंबई लोकलमध्ये विषारी गॅस सोडण्याचा प्लॅन रचला होता. गुप्तचर विभागाने याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली आहे. मुंबई लोकल आणि स्टेशनवर सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे.

काही संशयास्पद आढळल्यास कसून तपासणी केली जात आहे. रेल्वे स्थानकांवरील मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, दहशतवाद्यानी मुंबई लोकलची रेकी देखील केली होती असेही समजत आहे.

Leave a Comment