मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या रडारावर?? गृहमंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. त्यानुसार त्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता, अशी माहिती समोर आली. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. वळसे -पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या बैठकीबाबत स्वत: माहिती दिली आहे. दिल्लीत सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली. ही संवेदनशील घटना आहे. देशाच्या स्तरावरील ही घटना आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, या बैठकीतील कायदेशीर माहिती घेतल्यानंतरच त्यावर अधिक भाष्य करता येईल. आताच काही बोलणं योग्य होणार नाही, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर भारतात विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी रेकी केली होती. ऐन सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ला करण्याची तयारी या दहशतवाद्यांनी केली होती. याशिवाय देशात विविध ठिकाणी याआधीच स्फोटकं पाठविण्यात आलेली असल्याची शक्यताही चौकशीतून व्यक्त करण्यात आली

You might also like