Monday, January 30, 2023

चाचण्यांचे प्रमाण वाढविले : सातारा जिल्ह्यात 575 पॉझिटिव्ह तर 9 हजार 842 चाचण्यांची तपासणी

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये फक्त 575 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 172 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 9 हजार 842 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पॉझिटिव्ह रेट 5.84 इतका आला आहे.

- Advertisement -

सातारा जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 487 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 3 हजार 787 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 89 हजार 231 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 906 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 18 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 9 हजार 842 जणांचे नमुने घेण्यात आले.

कोरोना रूग्णांची वाढ होण्यामागचे कारण म्हणजे बाजारपेठांमधे गर्दी वाढताना दिसत आहे. व्यापारी, व्यावसायिक, नागरिक हे नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करत आहेत मात्र अनेक नागरिक हे विनामास्क गर्दी करताना दिसत आहे. सातारा जिल्हयात कोविड 19 चा प्रादुर्गाव सुरु आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पातळीवरुन उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत जिल्हयात 9 लाख 82 हजार 273 एवढया लाभार्थीनी पहिला व दुसरा कोविड 19 लसीकरण डोस घेतला आहे.

सातारा जिल्हात कोरोनाचा धोका अधिकच वाढण्याची शक्यता लक्षात घेत आता आरोग्य विभागाने रविवारी महत्वाचा निर्णय घेतला. यापुढे आता सातारा जिल्ह्यातील सातारासह कराड, फलटण व वाई या फक्त शहरी भागात कोविड 19 लसीकरण सत्र 100 टक्के ऑनलाईन नोंदणीनुसारच घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हंटले आहे.