पाककला | सीमा जंगम
साहित्य:-
७ कप बेसन, १/२ कप बारीक चिरलेला कांदा, ६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ६ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २ लाल मिरच्या, आलं, १ लहान चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, तेल, ५ कप आंबट दही, मोहरी, हळदपूड, हिंग, सजावटीसाठी साहित्य.
कृती:-
◆ सर्वप्रथम कढी पकोडे बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जवळ घ्यावे.
◆ सुरुवातीला दही घ्यावे, दह्यामध्ये बेसन व पाणी घालून हाताने एकजीव करुन घ्यावा.
◆ एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, हिंगाची फोडणी घाला. मग त्यामध्ये आलं, हिरव्या मिरच्या व हळद घाला.
◆ त्यानंतर दही-बेसनाचं मिश्रण व मीठ घाला. मोठ्या आचेवर मिश्रण उकळा. मग आच कमी करा. जवळपास १५ मिनिटं मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
◆ आता पकोड्यांसाठी बेसनामध्ये पाणी घालून घट्ट भजीसारखं पीठ तयार करा व ते व्यवस्थित फेटा.
◆ यामध्ये चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मीठ व गरम तेल घाला. पुन्हा एकवार फेटा. मग गरम तेलात याचे पकोडे तयार करा.
◆ शिजलेल्या कढीमध्ये पकोडे टाका व ५ मिनिटे आणखी मंद आचेवर शिजू द्या. यानंतर सर्व्हींग बाऊलमध्ये कढी ओता.
◆ एक चमचा तेल गरम करुन त्यामध्ये लाल मिरची परता व ही फोडणी कढीवर ओता.
आता ही कढी दिसायलाही छान दिसते. मस्त खमंग वास किचनमध्ये दरवळत राहील. पकोडे क्रिप्सी बनल्यामुळे कढीवरील फोडणी आणि कढी यांचे चांगले कॉम्बिनेशन होते. आता चमचाने खाण्यासाठी हे टेष्टी ‘कढी पकोडे’तयार आहेत.