ठाकरे सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही : संजय राऊतांनी विरोधकांना ठणकावले.

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत. हा एक नवा ट्रेंड सुरु झालाय. ज्यात जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. या प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही,’ मात्र विरोधकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावे कि, महाराष्ट्रातील सरकारला कोंडीत पकडण्याचे विरोधकांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. ठाकरे सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही. असं म्हणत राऊतांनी विरोधकांना ठणकावले.

शिवसेनेचे संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. राज्यातील विरोधक केंद्रीय तपास यंत्रणांसाठी लाल गालिचे अंथरत आहेत. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्र काय देशाच्या इतिहासात घडलं नाही. मात्र, कडवट आणि खरा शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण तो बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ कधीची घेणार नाही, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री अनिल परब यांची पाठराखण केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असणाऱ्या सचिन वाझे यांनी पत्र लिहून अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात दबावाचं राजकारण यशस्वी होणार नाही. विरोधकांनी कितीही अडथळे निर्माण केले तरी आम्ही ते भेदून पुढे जाऊ. निडरपणे लढून सर्व संकटं परतावून लावू. विरोधक हे सरकारमधील मंत्र्यांचे चारित्र्यहनन करायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी लॉकअपमधील आरोपींकडून काही गोष्टी वदवून घेतल्या जात आहेत. अनिल परब यांच्यावर आरोप करणारा पत्रलेखक सध्या एनआआयएच्या ताब्यात आहे. हा पत्रलेखक संत किंवा महात्मा आहे का, यावर भाजपनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. मात्र, जेलमध्ये आणखी काही व्यक्ती आहेत. त्यादेखील पत्र लिहू शकतात, असा गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिला.

अंबानी स्फोटक प्रकरणामध्ये एनआयएच्या ताब्यात असलेल्या  सचिन वाझेंनी एका पत्राद्वारे अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांनी ५० कोटी खंडणी मागितल्याचे सचिन वाझेनी म्हटले आहे यावरुन राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय तपास यंत्रणांसाठी महाराष्ट्रात विरोधी पक्ष लाल गालिचे अंथरत आहेत हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या सरकारला जर कोणी आशा प्रकारे कोंडीत पकडून सरकार अस्थिर करण्यासाठी डाव पेच अशाप्रकारे करत असतील ते यशस्वी होणार नाही. काल अजून एक पत्र आले आहे. एका पत्र लेखकाने हे पत्र लिहिले असून एनआयएच्या हाती हे पत्र आहे. हे पत्र लेखक एनआयएच्या लॉकअपमध्ये आहे. अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतिहासात घडले नसेल फक्त कॅरेक्टर असासिनेशन करायचे त्यासाठी अनेक यंत्रणांचा वापर करायचा आपल्या राजकीय पक्षाचे आयटी सेल वापरायचे, लॉकअपमधल्या आरोपींना पकडायचे त्यांच्याकडून काही वधवून घ्यायचे असे अनेकांच्या बाबतीत होत असल्याचे यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

You might also like