हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षावरील उद्या होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 24 तासांत दुसऱ्यांदा सुनावणी लांबणीवर पडणार आहे. खरं तर आजच यावर सुनावणी पार पडणार होती. पण आजची सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आणि आता उद्या होणारी सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या सुनावणीच्या यादीत राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरणच नसल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे यावरील सुनावणी अजून लांबणीवर पडणार आहे. न्यायमूर्ती व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. त्यातच आता रमण्णा 26 ऑगस्टला निवृत्त होत असल्याने त्यांच्या कडून याबाबत निर्णय घेतला जातोय का? याकडे दोन्ही गटाचे लक्ष असणार आहे.
16 बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, राज्यपालांनी घेतलेल्या बहुमत चाचणीवर शिवसेनेने घेतलेला आक्षेप तसेच विधानसभा अध्यक्षांची निवड, मुख्य प्रदोत निवड, विधानसभा उपाध्यक्षांबाबत बंडखोर आमदारांनी आणलेला प्रस्ताव अशा एकूण 5 याचिकांवर सुनावणी पार पडणार आहे. तसेच खरी शिवसेना कोणाची ? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची याचाही फैसला कोर्टात होईल. पण आता पुन्हा एकदा सुनावणी लांबल्याची शक्यता आहे