Tuesday, January 31, 2023

थायलंडहून बोलावलेल्या Call Girl प्रकरणाला नवे वळण; अनेक बडे नेते अडकण्याची शक्यता ?

- Advertisement -

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून लखनऊमध्ये एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या प्रकरणात एका कॉलगर्लला थायलंडवरून बोलावण्यात आले होते. यानंतर भारतामध्ये तिचा मृत्यू झाला होता. यानंतर या प्रकरणाशी संबंधित काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी मोठे नेते अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित 50 मोबाइल क्रमांकांची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी भाजपचे राज्यसभा खासदार संजय सेठ यांच्या मुलावरदेखील आरोप करण्यात आले आहेत. त्यातच समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी ती कॉलगर्ल सेठ यांच्या मुलाने बोलावली असल्याचा आरोप केला आहे. संजय सेठ फक्त भाजप नेताच नाही तर बांधकाम क्षेत्रातही त्यांचे मोठे नाव आहे. यामुळे आयपी सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हि कॉलगर्ल मागच्या 3 वर्षांपासून लखनऊमध्ये येत होती आणि शहरातील मोठ्या स्पा सेंटरमध्ये काम करत होती. अनेक बडे नेते आणि व्यावसायिक तिच्या स्पा सेंटरमध्ये मसाज करण्यासाठी येत असत. या नंतर अनेक हायप्रोफाइल लोकांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 3 मे ला या महिलेची तब्येत अचानक बिघडल्याने तिचा मृत्यू झाला होता, त्यामुळे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चिघळले होते. थायलंडवरून आलेल्या या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर संजय सेठ आणि त्यांच्या कुटुंबावर सोशल मीडियावरून आरोप करण्यात आले. यानंतर संजय सेठ यांनी पोलीस कमिश्नरांना पत्र लिहून याप्रकरणाची विस्तृत चौकशी करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी प्रतीमा मलिन करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणीदेखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

हि महिला 2019 मध्ये कामानिमित्त थायलंडहून लखनऊमध्ये आली होती. या ठिकाणी तिची सलमान नावाच्या एका व्यक्तीबरोबर ओळख झाली. यानंतर तिने राकेश शर्मा या छत्तीसगडमधील व्यक्तीच्या Thai O2 या स्पा सेंटरमध्ये काम मिळवले. सलमान हा त्या स्पा सेंटरचा मॅनेजर होता. हे स्पा सेंटर गोमतीनगरमधील सिनेपोलीस मॉलच्या जवळ होते. हि महिला एका हॉटेलमध्ये राहत होती. हे स्पा सेंटर 8 एप्रिलपासून बंद होते. त्यानंतर 23 एप्रिल रोजी त्या महिलेची तब्येत बिघडली आणि 8 मे रोजी तिचा मृत्यू झाला. तिची तब्येत बिघडल्यानंतर त्या महिलेला उपचारासाठी लोहिया रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अशी माहिती DCP पूर्वी संजीव सुमन यांनी दिली आहे.

Passport

हाती आलेल्या माहितीनुसार सलमाननेच त्या महिलेला रुग्णालयात भरती केले होते. ती 31 मार्चलाच लखनऊमध्ये आली होती. अजूनपर्यंत संजय सेठ,त्यांच्या मुलाचे व नातेवाईकांचे या प्रकरणाशी संबंधित कोणतेच कनेक्शन समोर आले नाही आहे. या प्रकरणाशी संबंधित 50 पेक्षा जास्त मोबाइल क्रमाकांचे डिटेल्स मागवण्यात आले आहेत. यासाठी काही सोशल मीडिया अकाउंट्ससुद्धा तपासण्यात येणार आहे. पोलीस या प्रकरणाचा विविध अँगलने तपास करत आहेत. या प्रकरणाशी संबंधित अनेक बड्या नेत्यांची आणि व्यावसायिकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.