मविआ सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्षातील नेते मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब नंतर राजकीय खळबळ उडाली असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्ष टिकणार असून तिन्ही पक्षातील नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असेही राऊत म्हणाले. हे सरकार चालवन ही तिन्ही पक्षांची कमिटमेंट आहे . कॉमन मिनिमम प्रोग्राम हाच सरकार चालवण्याचा मुख्य आधार आणि पाया आहे. या तीन पक्षातील समन्वय हा आदर्श समन्वयाच उदाहरण आहे.

प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार असून शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी आहे. ते सध्या अडचणीत असून त्यांच्या अडचणीचे स्पष्ट कारण त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विनाकारण त्रास देत आहे. आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपण मोदींशी जुळवून घ्यावे अस त्यांनी म्हणल्याच राऊतांनी सांगितले.

आमचं काळीज वाघाचं आहे, उंदराचे नव्हे अस म्हणत आम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारे बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार आहोत असे राऊतांनी म्हंटल. तसेच भाजप कडून तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला. फार तर तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकाल, आमची ती सुद्धा तयारी आहे असं संजय राऊत यांनी म्हंटल.

Leave a Comment