ठाण्याच्या महापौरांना दाऊदच्या नावे धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी। महापौर मीनाक्षी शिंदे यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी आल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. ‘ठाण्यात तुम्ही खूप भांडण करत असून, नीट न वागल्यास उचलून नेऊ’, अशी ही धमकी आहे. याप्रकरणी त्यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, धमकी देणाऱ्याचा पोलिसांकडून शोध चालू आहे.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा मंगळवारी ठाण्यात आली होती. त्यावेळी महापौर शिंदे उपस्थित होत्या. रात्री घरी गेल्यानंतर मोबाइल फोनवर त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरील व्यक्तीने, ‘मी डोंगरीवरून दाऊदचा माणूस बोलत आहे, छोटा शकीलला ओळखता का? तुम्ही ठाण्यात खूप भांडणे करता. तुम्ही नीट न राहिल्यास तुम्हाला उचलून नेऊ. तुमच्या कुटुंबालाही त्रास देऊ’, अशी धमकी त्याने महापौरांना दिली. ज्या नंबरवरून हा फोन आला होता तो एका महिलेच्या नावावर असल्याचे समजते. मात्र, ही महिला फोन वापरत नसल्याचे कळते.

दरम्यान गेल्या काही वर्षांपासून महापौर मिनाक्षी शिंदे यांनी उत्कृष्ट काम ठाण्यात केले आहे. महापालिकेच्या महासभेत देखील ठोस निर्णय घेतले आहेत. काही वेळा तर मिनाक्षी शिंदे यांनी कठोर निर्णय घेऊन प्रशासनाला अंगावर देखील घेतले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या महापौर शिंदे यांना गुंड तसेच गँगस्टर यांच्या नावाने फोन आल्याने ठाण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment