धक्कादायक! चाकूने केसांसह काढली डोक्याची कातडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी | अमित राऊत

आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्याती अंबेझरी या गावी काल माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून हे कृत्य दुसरा-तीसरा कुणी केले नसून कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका ठाणेदारा कडून घडले आहे. या महाशयाने खिशातील धारदार चाकू काढून एका युवकाच्या डोक्याची केसांसह चक्क कातडीच काढून जमीनीवर फेकली.

सविस्तर वृत्त असे की आंबेझरी येथील देविदास कंदलवार नामक युवक दारूच्या नशेत गावकऱ्यांना त्रास देत होता. पिटीगुडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने सदर ठाण्याचे ठाणेदार कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता तीन शिपाई घेऊन सरळ घरात घुसून देविदासला अमानुष मारहाण सूरू केली. इतक्यावरच समाधान न मानता ठाणेदाराने खिशातून धारदार चाकूने त्याचे डोक्यातील केसांसह चक्क कातडीच काढून जमीनीवर फेकली. देविदास रक्तबंबाळ झाल्याचे पाहून पत्नीने सोडवायचा प्रयत्न केला मात्र त्यालाही जबर मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सुद्धा हाकलून लावण्यात आले.

रक्तस्त्राव वाढत असल्याचे लक्षात घेऊन सदर ठाण्यातील पोलिसांनी रात्री उशिरा देविदासला जखमी अवस्थेत गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे आणले. येथील काही संधीसाधू,तथाकथित नेते व ठाणेदाराच्या काही मित्रमंडळी कडून सदर प्रकरण दडपण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आला परंतु येथील नागरिकांच्या सजगतेने सफलता मिळाली नाही. कायद्याचे रक्षणकर्ताच जर भक्षक बनले तर सर्वसाधारण लोकांनी दाद कुणाला मागावी, असे सदर प्रकरणावरून लक्षात येते.

ठाणेदाराच्या या अमानवीय कृत्य माणुसकीला काळीमा फासणारी असून सदर ठाणेदारावर कायदेशीर कारवाई करून त्याच्या निलंबनाची मागणी विविध राजकीय नेते, समाज सेवक व जखमींच्या नातेवाईकांनी केली आहे. वरीष्ठ पातळीवर याची दखल घेऊन ठाणेदारावर निलंबनाची कारवाई होते की प्रकरण दडपले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment