‘त्या’ चारचाकी गाडीची सम्राट महाडिक यांच्याकडून पाहणी, महाडिक उद्योग समूहाकडून कुमार पाटील यांचा सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळत शेतकर्‍यांसाठी उपयुक्त चारचाकी गाडीची निर्मिती करणार्‍या कुमार पाटील यांची भेट घेत युवा नेते सम्राट महाडिक यांनी कौतुक केले. सम्राट महाडिक यांनी कुमार पाटील यांच्या वर्कशॉपला प्रत्यक्ष भेट दिली आणि चारचाकी गाडीची पाहणी केली. इस्लामपूर पेठ रस्त्यावरील विष्णू नगर येथील फेब्रिकेशन व्यवसायिक कुमार पाटील यांनी एक वर्षाची मेहनत घेऊन शेतकर्‍यांना उपयुक्त ठरणारी गाडीची निर्मिती केली आहे.

फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्ये वापरत दुचाकीच्या इंजिनचा वापर केलेली चार चाकीगाडी शेतकर्‍यांना उपयुक्त आहे. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे कशी करता येईल? शेतकर्‍यांना छोटी-छोटी सायकल कोळपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देत असतानाच या गाडीची कल्पना कशी सुचली? लोखंडी साहित्य वापरताना कोणत्या दुचाकीचे इंजिन वापरले? गाडीला शेती अवजारे कशी जोडता येतील? याबाबत महाडिक यांनी माहिती जाणून घेतली.

सम्राट महाडिक म्हणाले, कुमार पाटील यांच्या नवनिर्मिती कौशल्याचा वापर नक्की शेतकर्‍यांना होईल. कमी खर्चामध्ये बनवलेली गाडी शेतकर्‍यांना वरदान आहे. शासनाने कुमार पाटील व जाफर नायकवडी यांना प्रशिक्षित करून मदत करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच महाडिक उद्योग समूह नेहमी तुमच्या पाठीशी राहणार असल्याचा विश्वास दिला. यावेळी पेठ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शंकर पाटील, सुरेश कदम, आनंदराव कदम, रमेश कदम, अमोल कदम, रूपेश कदम, प्रशांत कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. इराप्पा पाटील व मयुरेश पाटील यांनी स्वागत केले.

Leave a Comment