.. म्हणून विराट आणि स्मिथ यांच्यात तुलना करणं सचिनला आवडत नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ याची फलंदाजीची शैली आवडते पण या दोन फलंदाजांमध्ये केली जाणारी तुलना त्याला आवडत नाही. दोन्ही फलंदाजांना खेळताना पाहणे हा एक आनंददायी अनुभव असल्याचे सचिनने शुक्रवारी सांगितले, परंतु त्यांची तुलना करण्याची त्याची इच्छा नाही. सचिन सध्या बुशफायर क्रिकेट बॅश खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे.

एका खासगी संकेतस्थळाशी बोलताना सचिन म्हणाला, “मला तुलना आवडत नाही. लोक माझी आणि इतर काही खेळाडूंमध्ये तुलना करायचे. माझ्या मते एखाद्या खेळाडूला खेळायला सोडून दिले पाहिजे.” तो पुढे म्हणाला, ”मला वाटते कोहली आणि स्मिथ उत्तम फलंदाज आहेत. आणि त्यांना खेळताना पाहणे आनंददायी अनुभव आहे. हे दोघेही आपल्या खेळातून क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करतात आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.” असंही सचिनने सांगितलं.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment