प्रसिध्द मश्रूम गणपतीचा 14 लाखाचा सोन्याच्या कळस चोरीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | आज गणेश चतुर्थीला सर्वत्र गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन सुरू आहे. परंतु दुसरीकडे सोलापुरातील प्रसिद्ध मश्रूम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस पुन्हा एकदा चोरीला गेला आहे. 25 किलोच्या या कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा असून त्यांची किंमत 14 लाख रूपये इतकी आहे. गणेशाच्या आगमनाला मध्यरात्री मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याने भाविकांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे. सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला गेला असून यापूर्वी 2017 साली देखील मश्रूम गणपतीच्या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता.

सोलापूर- तुळजापूर महामार्गावरील तळेहिप्परगा गाव आहे. या गावात मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वरांनी या मश्रूम गणपती स्थापन केले असल्याचे सांगितले जाते. या मंदिरावर 25 किलो वजनाच्या कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा चढवला आहे. मश्रूम गणेश मंदिराचे पुजारी संजय किसनराव पतंगे आज (31ऑगस्ट) पहाटे मंदिरात आल्यावर त्यांना कळस चोरीला गेल्याचं समजलं. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊ पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

याआधी 2017 मध्ये या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता. मंदिरावरील कळस चोरीला गेल्याने आरोपींना तातडीने अटक करुन कडक कारवाई करा, अशी मागणी करण्यात येत आहे. मंदिराबाबत अशा वारंवार घटना घडत असल्याने भाविकांसह नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.