व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वैरणीच्या गंजीला लागलेल्या आगीत जनावरे होरपळली तर दोघे जखमी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

मरळोशी (ता.पाटण) येथे घरापाठीमागे असलेल्या वैरणीच्या गंजीला व जनावरांच्या मांडवाला लागलेल्या आगीत पाच जनावरे भाजून जखमी झाली आहेत. बुधवार, दि. 18 रोजी दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. गावकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती देण्यात आली आहे. आगीत बैल, व म्हैस गंभीर जखमी झाले आहेत. तर एक बैल, गाय व रेडकू किरकोळ जखमी झाले आहे. आग विझविण्याचा प्रयत्न कदम यांनाही आगीची झळ बसली असून तेही किरकोळ जखमी झाले आहेत. जगन्नाथ कदम यांचा घरापाठीमागे उन्हाळ्यात जनावरांचा मांडव असतो. मांडवाशेजारी वैरणीची गंज होती. मांडवात दोन बैल, एक गाय, एक म्हैस व एक रेडकू बांधलेले होते. तसेच बाजूला लावलेल्या गंजीत साडेतीन हजार कडबा, दोन ट्राली भात्यान, सात हजार गवताची गंज होती. तसेच जळण काठी व शेतीची औजारे मांडवात होती.

दुपारी कदम कुटुंबीय जेवण झाल्यानंतर घरात आराम करत होते. तीनच्या दरम्यान काही लोकांना कदम यांच्या घरापाठीमागे धुराचे लोट दिसून आले. त्यांनी तिकडे धाव घेतली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले काही लोक होते तर काही जनावरे दोर कापून जनावरे सोडवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत एक बैल व एक महिला गंभीर जखमी झाले इतर जनावरांना आगीची किरकोळ बसली आहे.

आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. दुपारच्या कडक उन्हाच्या व आगीच्या झळांमुळे त्यात यश आले नाही. यामध्ये वैरण, शेतीची औजारे व अन्य साहित्य असा दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गावकऱ्यांबरोबर आगीवर नियंत्रण करताना कदम जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. आगीतील नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.