आईच्या कुशीतून गायब झालेलं बाळ मृत अवस्थेत सापडलं; 25 दिवसांच्या बाळाच्या खूनाने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापुर | मुरारजी पेठेतील मंगळवेढा चाळीतील अवघ्या 25 दिवसांच्या पुरुष जातीच्या बाळाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परवा रात्रीच्या सुमारास आईच्या कुशीतून गायब झालेल्या बाळाची शोधाशोध सुरु असताना बाळाचा मृतदेह घराबाहेर असणाऱ्या पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळून आला. दरम्यान,काल पहाटे हा सर्व प्रकार उघडकीस आला.

प्रतीक्षा आणि संकेत या दाम्पत्याला 25 दिवसांपूर्वीच एका पुरुष जातीच्या बाळाची प्राप्ती झाली, त्यांना एक मोठा मुलगा देखील आहे. अवघ्या कांही दिवसांवर या बाळाचा नामकरण विधी होणार होता. मात्र, त्याआगोदरच हा प्रकार घडल्याने सुरवसे परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

याबाबत फौजदार चावडी पोलीस चौकशी करत असून यासाठी बाळाची आई, वडील, आत्या, काका आणि अन्य नातेवाईकांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं आहे. सोलापुरातील शासकीय रुग्नालयात बळावर शवविच्छेद केलेलं असून मृतदेह नातेवाईकच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करत आहेत.

Leave a Comment