उद्या दिसणार 580 वर्षातील सर्वात मोठे आंशिक चंद्रग्रहण; तब्बल ‘एवढा’ वेळ चालणार चंद्रग्रहण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खगोलशास्त्रप्रेमी आणि आकाश निरीक्षक यांच्यासाठी उद्याचा दिवस खास असणार आहे. उद्या 19 नोव्हेंबर रोजी आंशिक चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण 580 वर्षांतील सर्वात मोठे चंद्रग्रहण असणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण 3 तास 28 मिनिटे आणि 24 सेकंद चालणार आहे. हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी 12.48 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 4.17 वाजता संपणार आहे. तुम्ही हे चंद्रग्रहण ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर देखील पाहू शकता.

“अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील काही भागात पूर्व क्षितिजाच्या अगदी जवळ, चंद्रोदयानंतर आंशिक ग्रहणाचे शेवटचे क्षण अनुभवले जातील. आंशिक ग्रहण दुपारी 2.34 वाजता त्याच्या शिखरावर पोहोचेल कारण तोपर्यंत चंद्राचा 97 टक्के भाग पृथ्वीच्या सावलीने झाकलेला असेल. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधील लोक ग्रहणाचा शेवटचा भाग पाहू शकतात अशी माहिती कोलकाता एमपी बिर्ला प्लॅनेटेरियमचे संशोधन आणि शैक्षणिक संचालक देबीप्रसाद दुआरी यांनी दिली आहे.

तसेच उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक प्रदेशातील लोक अधिक भाग्यवान असणार आहेत कारण या ठिकाणी हे ग्रहण अधिक चांगल्या प्रकारे दिसणार आहे. जेव्हा चंद्र पूर्ण अवस्थेत असतो तेव्हा चंद्रग्रहण होते, कारण तेव्हा सूर्य चंद्राच्या पृष्ठभागाला पूर्णपणे प्रकाशित करतो आणि पृथ्वी त्यांच्यामध्ये असते.19 नोव्हेंबरची पौर्णिमा वैरिओसू नावाने ओळखली जाते. भारतात तो कार्तिक पौर्णिमा किंवा कार्तिक दीपम सण म्हणून साजरा केला जातो. तो थायलंडमध्ये लोई क्राथॉन्ग सण आणि म्यानमारमध्ये ताझांगडांग उत्सव म्हणून साजरा केला जातो.

Leave a Comment