भाजपाने छ. उदयनराजे भोसले यांची मंत्रिपदाबाबत फसवणूक केली : शशिकांत शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचे प्राबल्य नाही, त्यांनी आमचीच माणसं घेतली. छ. उदयनराजे भोसले राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या मदतीने खासदार झाले होते. त्यांची कारकिर्द पूर्ण होण्याअगोदर त्यांनी राजीनामा दिला. मला असं वाटतं, एखादे आश्वासन दिले जाते आणि ते पूर्ण केले जात नाही. तेव्हा त्यांची फसवणूक केली आहे. जी माणसे आजपर्यंत छत्रपतीच्या विचारांना विरोध करत आली अशा माणसांकडून अपेक्षा ठेवण किंवा विश्वास ठेवण योग्य नव्हत. तरीही विश्वास ठेवाला, रणजितसिंह निंबाळकर किंवा छ. उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद मिळाले असते तर सातारा जिल्ह्याला आनंद झाला असता असे मत विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

शशिकांत शिंदे म्हणाले, मला जी माहीती मिळाली, त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार होईल तेव्हा त्यांना निश्चितपणे मंत्रिपद दिले जाणार होते. त्या हेतूने छ. उदयनराजे यांनी पक्ष बदल केला. शरद पवार आणि उदयनराजे यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. काैटुबिंक नाते निर्माण करणारा आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे. छ. उदयनराजे यांना राष्ट्रवादीत मान- सन्मान होता, पवार साहेबांचे जवळचे नेतृत्व मानत होते. भाजपामध्ये जावून त्यांचे मोठे नुकसान झाले.

छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून काही विचारांची माणसं महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होती. आजही करतात तो कालच्या निवडीमुळे दिसून आला. तुम्हांला शब्द दिला होता तर पाळला का नाही? त्यांच्या सन्मानाला डावलेले गेल्याचे मत सातारकर आज व्यक्त करत आहेत. छत्रपतीच्या गादीवर अन्याय करण्याची भूमिका कोण करत हे यानिमित्ताने पहायला मिळाले.

Leave a Comment