विवस्त्र अवस्थेत आढळला आदिवासी महिलेचा मृतदेह; बलात्कार करुन हत्या केल्याचा संशय

अमरावती | मोर्शी तालुक्यातील तळेगाव शेतशिवार परिसरात रात्री एका आदिवासी महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आधी बलात्कार आणि नंतर या मजूर महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हत्या झालेल्या महिलेची ओळख पटू नये यासाठी चेहऱ्यावर दगडाने वार केले असून महिलेच्या गुप्तांगात देखील जखमा झाल्या आहे. गावातील पोलीस पाटलाच्या शेतात हा मृतदेह पडून होता. त्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत महिलेची ओळख पटवली आहे. नजरपूर मध्यप्रदेश येथील ही महिला आहे तर अद्यापही आरोपींचा शोध लागला नाही.

दरम्यान, घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर जिल्हात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह गेल्या दोन दिवसांपासून पडून असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like