Monday, January 30, 2023

कराडमध्ये धारदार शस्त्राने वार करून डोक्यात फरशी घालून एकाचा निघृण खून; मंडई भागातील घटना; ३ संशयित पसार

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

धारदार शस्त्राने वार करून व डोक्यात फरशी घालून एकाचा निर्घुण खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. कराडच्या भाजी मंडई परिसरात ही घटना घडली असून तीन संशयितांनी हा खून केला असून खूनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. जुबेर जहांगीर आंबेकरी (वय 30 रा. कुरेशी मोहल्ला कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जुबेर आंबेकरी भाजी मंडई परिसरात भांडण सुरू होते. यावेळी त्याच्यावर तीन संशयितांनी त्याच्यावर चाकूने वार करून हल्ला केला तसेच त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जुबेरला उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची फिर्याद जावीर जहांगीर आंबेकरी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली असून याबाबतचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’