शहरातील जुन्या बीड बायपासचा भार होणार कमी, कारण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी-आडगाव पासून नवीन बीड बायपास रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. आता 15 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान येथे टोल आकारण्यास सुरवात केली जाणार आहे. हा मार्ग सुरु झाल्यामुळे शहरातील जुन्या बीड बायपास रोडवरील वाहतुकीचा भार हलका होणार आहे. लवकरच या रस्त्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आडगाव (निपाणी) येथून सुरू होणारा हा बायपास गांधेली, बागतलाव, बाळापूर देवळाई, सातारा, कांचनवाडी, गोलवाडी, वळदगाव, एएस क्लब, करोडी, माळीवाडा असा 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटरच्या या चौपदरी रस्त्यामुळे जुन्या बीड बायपास रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच जुन्या बायपासवर दर आठवड्याला होणारी अपघातांची संख्ये अटोक्यात येण्यास मदत होणार आहे. आडगाव निपाणी ते माळीवाडा चौपदरी झालेला 30 किलोमीटरचा रस्ता डोळ्याचे पारणे फेडणार आहे. जमिनीपासून 1 ते 9 मीटर उंची, दोन्ही बाजूंनी दगडांची पिचिंग, दुभाजकात फुलझाडांनी केलेले सुशोभीकरण, दुतर्फा बॅरिकेडिंग, लेन मार्किंग, दिशादर्शक फलक व सूचनांच्या पाट्यांनी हा रस्ता सजला आहे. अलगद वळणे, डोंगर, तलाव आणि एका बाजूने औरंगाबाद शहर असा या रस्त्याचा नजारा आहे. वन विभाग आणि पर्यावरणाचे नियम पाळून हा रस्ता तयार झाला आहे.

या रस्त्यासाठी आडगाव (निपाणी) ते करोडी या तीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी 512.99 कोटी रुपयांचे बजट होते. यासाठी 910 दिवसांचा बांधकाम कालावधी तर क्रॉन्ट्रक्ट कालावधी हा अडीच वर्षाचा होता. यासाठी 31 जानेवारी 2018 रोजी डेट इश्यू करण्यात आली तर 27 फेब्रुवारी 2018 रोजी ॲग्रिमेंट करण्यात आले. रस्त्यासाठी कम्प्लेशन शेड्यूल तारीख ही 10 ऑगस्ट 2021 रोजी ही होती. तीस किलोमीटरच्या रस्त्यामध्ये 1 मोठा पूल, 29 छोटे पूल, पुन्हा बांधले जाणार पूल 2 रिकन्स्ट्रक्शन ब्रिज, वाहनांसाठी अंडरपास 8, व्हेईकल ओव्हर पास 1, पादचारी अंडरपास 4, कॅटल अंडरपास 1, किरकोळ जंक्शन 2 राहणार आहे.

Leave a Comment