केंद्र सरकारने राज्य सरकारला इम्पेरीकल डाटा द्यावा; समता परिषदेची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा राज्य सरकारला द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल आणि समता परिषद यांच्या वतीने आज 7 ऑगस्ट रोजी भडकल गेट येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल व महात्मा फुले समता परिषद यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

भारताचे दिवंगत प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी सात ऑगस्टला देशात ओबीसींना न्याय देण्यासाठी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणारा मंडल आयोग स्वीकारून लागू करण्यात आला. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये इंद्रा सहानी हे मंडल आयोगाला आव्हान देणारे प्रकरण गाजले होते. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने 16 नोव्हेंबर 1992 रोजी ओबीसीचा मंडल आयोग अवैध ठरवून ओबीसींना शिक्षणात आणि नोकरीमध्ये 27 टक्के आरक्षण, नॉन क्रिमिनलची अट टाकून मान्य केले होते. असे असतानाही सतत ओबीसींना त्यांचे हक्काचे आरक्षण मिळत नाही. त्याचबरोबर मंडळ आयोगाने शिफारशी केल्या प्रमाणे ओबीसींची जनगणना होत नाही, असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

ओबीसी सेलचा प्रश्न जर त्वरित मार्गी लागला नाही तर आम्ही केंद्राचा जो मंत्री मराठवाडा आणि औरंगाबाद दौऱ्यावर येईल त्यांना घेराव घालण्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला. यावेळी मनोज घोडके, सुरेश बनसोड, विजय राव साळवे, निशांत पवार, गजानन सोनवणे, गणेश आंबेकर, चंद्रकांत पेहरकर, रफिक शेख आदी आंदोलनकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Comment