व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आता मराठीत होणार वर्ल्डकप टी 20 चे समालोचन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे समीकरण गेली अनेक वर्ष जपण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केले जात आहे. मनसेनेने आता पुन्हा एकदा आपला मनसे इंपॅक्ट दाखवला आहे. नुकतीच आयपीएल 2021 संपली आहे. आणि याचे समालोचन इतर भाषांसोबत मराठीत व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी हॉटस्टार सोबत पत्रव्यवहार करत आयपीएलचे समालोचन मराठीत करावे याची मागणी धरून ठेवली होती. त्यानंतर हॉटस्टारने आता झालेल्या सामान्यांचे समालोचन मराठीत केले आहे.

यानंतर वर्ल्डकप टी 20 चे समालोचन मराठीत व्हावे अशी मागणी मनसेने केली तेव्हा हॉटस्टारने या वर्षी ही मागणी पुर्ण होऊ शकणार नसल्याची माहिती ट्विट करत दिली होती. मात्र, मनसे पदाधिकाऱ्यानी आक्रमक पावित्रा घेतला असता हॉटस्टारने वर्ल्ड कपचा सामना आणि त्याचे समालोचन मराठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीत समालोचन करण्याच्या निर्णयाबाबत केतन नाईक यांनी म्हंटले की, विषय नुसता समालोचनाचा नसून त्यातून निर्माण होत असलेल्या अर्थकारणाचा आहे. मराठी भाषेतील जाणकारांना रोजगार मिळणार असेल तर तो आम्हाला हवा आहे व अशाच प्रकारचे काम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही अपेक्षित असते. म्हणून आम्ही वर्ल्डकप टी 20 चे समालोचन मराठीत व्हावे, अशी मागणी लावून धरली आहे.