Wednesday, March 29, 2023

योगाचा परिपूर्ण प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र्रा ऑनलाईन । व्यायाम करताना सूर्यनमस्कार घालणे जास्त फायदेशीर ठरत आहे. त्यानुसार योगाचा एक परिपूर्ण व्यायाम प्रकार पण आहे. जर तुम्हाला स्वच्छ राहायचे असेल आणि स्वस्थ राहण्याची इच्छा आहे पण त्यासाठी योग्य प्रकारचा वेळ मिळत नसेल तर त्यासाठी अश्या व्यायामाचा आपल्या दैन्यंदिन गोष्टींसाठी वापर करणे गरजेचे आहे. परिस्थितीवर मात करायची असेल तर त्याचं उत्तर एकच:सूर्यनमस्कार,जो १२ योगासनाचा संच आहे त्याचा वापर हा आपल्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया हि व्यवस्थित राहण्यासाठी मदत करते.

— सूर्यनमस्कार करण्यासाठी उत्तम वेळ सकाळी,रिकाम्या पोटी.या साध्या आणि प्रभावी सूर्यनमस्कारांने आपण स्वस्थ जीवनाची सुरुवात करू शकतो.

- Advertisement -

प्रणामासन

— नेहमी उभे राहतो त्या पद्धतीने उभे राहा. दोन्ही पाय एकत्र ठेवा, शरीराचे वजन दोन्ही पायांवर सारखे ठेवा.छाती पुढे करा आणि खांद्यांना आराम द्या. श्वास आत घेताना दोन्ही हात बाजूने वरती घ्या आणि श्वास बाहेर सोडताना दोन्ही तळहात छाती पुढे एकत्र आणून प्रार्थना मुद्रेमध्ये उभे रहा.

अश्व संचालय —

तुमचा उजवा पाय जास्तीत जास्त जमेल तेवढा मागे घ्या.उजव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवून वरती मान वळवून पहा.या योगमुद्रेच्या तणावामध्ये लक्ष द्या.
तुमचा डावा पाय हा दोन्ही तळहाताच्या मधोमध आहे याची खात्री करून घ्या.

हस्तपादासन

श्वास सोडताना कंबरेपासून पाठीचा कणा सरळ ठेवत, पुढच्या बाजूला खाली वाका. श्वास पूर्णपणे सोडल्यानंतर तुमचे तळहात खाली जमिनीवर पायांच्या बाजूला टेकवा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’