व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कंटेनरने कारला 2 किलोमीटर फरफटत नेलं; पहा थरारक Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-अहमदनगर महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की कंटेनरने कारला अक्षरश: फरफट नेले. सुदैवाने गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांना कोणतीही हानी झाली नाही. या अपघाताचा विडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावर शिकारापूरजवळ ही घटना घडली. एका ओव्हरफ्लो कंटेनरने एका कारला सुमारे 2 किमी अंतरापर्यंत फरफटत नेले. हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनर कारला फरफटत नेत असताना अक्षरशः ठिणग्या उडत असल्याचे देखील व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार महामार्गाच्या बाजूला असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दैव बलवत्तर म्हणून चारही प्रवासी या अपघातातून अगदी थोडक्यात बचावले आहेत. पण साक्षात मृत्यूलाच समोर पहिल्याचा अनुभव प्रवाशांना आला. नशिबाने काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, असच म्हणावं लागेल