Thursday, February 2, 2023

पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

- Advertisement -

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – वाशीममध्ये पोलीस निरीक्षकानेच महिला पोलीस अधिकाऱ्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर मारहाण करून अत्याचार केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसातील पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आरोपी पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे यांच्यावर वाशिम पोलिसांत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षकावर त्यांच्याच खात्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने वाशिम पोलिसांत मोठी खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्यात 2007 मध्ये विश्वकांत गुट्टे हे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असतांना त्यांची या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत ओळख झाली होती.

- Advertisement -

याच ओळखीचा फायदा घेत 30 मे रोजी वाशिम इथं विश्वकांत गुट्टे हे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी आले व त्यांनी जबरदस्ती करीत अत्याचार केले. महिला पोलिसाने याची तक्रार दाखल केल्याने आरोपी विरुद्ध 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्का गायकवाड करीत आहेत.आपल्याच खात्यातील एका कनिष्ठ महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर पोलीस विभागाकडून कोणती कारवाई करण्यात येईल याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.