3 मिनिटांचे 4 लाख रुपये? अभिनेत्री वर फसवणूकीचा गुन्हा; नेमकं काय आहे प्रकरण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कार्यक्रमासाठी उशिरा पोचणे, आयोजकांशी वाद घालणे या यामुळे अनेकदा ती वादात सापडली आहे. आता तर तिच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून थेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, खंडवा जिल्ह्यामध्ये देवी नवचंडी देवाधामच्यावतीनं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमामध्ये एक तासाच्या सादरीकरणासाठी अमिषानं चार लाख रुपये घेतले होते. मात्र तिनं केवळ तीन मिनिटांचा परफॉर्मन्स करुन तेथून पळ काढला. त्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली. अमिषा ने आपली फसवणूक केली असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे अमिषा पटेल च्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, आमिषाने या संपूर्ण प्रकरणी स्पष्टीकरण देत आयोजकांवर च आगपाखड केली आहे. आयोजकांनी कार्यक्रमाचे आयोजित व्यवस्थित केलं नव्हतं. मला माझ्या सुरक्षेची काळजी वाटत होती म्हणून मी त्या कार्यक्रमातून लगेच गेली अस अमिषा पटेल म्हणाली.

Leave a Comment