आता पूर्ण होणार UAE मध्ये काम करण्याचे स्वप्न, ‘Golden Visa’ चे नियम केले 10 वर्षांपर्यंत शिथिल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दुबई । संयुक्त अरब अमिरातीने (UAE) रविवारी अधिक व्यावसायिकांना 10 वर्षाचा गोल्डन व्हिसा देण्यास मान्यता दिली. यात पीएचडी पदवी धारक, चिकित्सक, इंजिनीअर्स आणि विद्यापीठांचे काही विशेष पदवीधर देखील आहेत. विशेष म्हणजे, युएई गल्फ देशांमध्ये स्थायिक होण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत हातभार लावण्यासाठी प्रतिभावान आणि अधिक व्यावसायिक लोकांना गोल्डन व्हिसा देते. दुबईचे राज्यपाल शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम (Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum) यांनी युएईचे पंतप्रधान आणि उपाध्यक्ष यांनी एका ट्विटमध्ये याची घोषणा केली.

https://twitter.com/HHShkMohd/status/1327957270416777216?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1327957270416777216%7Ctwgr%5E&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Fuae-expands-golden-visa-eligibility-allows-10-year-residency-to-more-professionals-ndav-3339500.html

देशात प्रतिभावान लोकांचे स्वागत आहे
त्यांनी ट्वीट केले की, ‘फिजीशन्स, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोग्रामिंग, सर्व पीएचडी पदवी धारक, कंप्यूटर इंजीनियरिंग, युएई मान्यताप्राप्त विद्यापीठांचे पदवीधर, प्रोग्रामिंग, वीज आणि बायोटेक्नॉलॉजी व्यावसायिक ज्यांचा जीपीए (Grade Point Average) 3.8 किंवा त्याहून अधिक असेल अशांना आम्ही दहा वर्षाचा गोल्डन व्हिसा देण्याच्या निर्णयाला मान्यता दिली गेली आहे.

शेख मोहम्मद यांनी ट्वीट केले की, ‘ही पहिली बॅच आहे आणि यानंतर इतर कॅटेगिरीही असतील, कुशल आणि हुशार लोकं युएईमध्ये यावेत आणि विकासाच्या या प्रक्रियेत सामील व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.’

या दिवसापासून नवीन गोल्डन व्हिसा लागू होईल
यावर गल्फ न्यूजने सांगितले की ,गोल्डन व्हिसा देखील विशेष पदवी धारकांना देण्यात येईल. यामध्ये महामारी विज्ञान, विषाणूशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रातील तज्ञांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे याला युएईच्या मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. 1 डिसेंबर 2020 पासून हे नियम लागू होतील. डायनॅमिक जीवनशैली आणि सुरक्षितता यांव्यतिरिक्त युएई मधील जीवनशैली आणि वैशिष्ट्ये मानली जाणारी गोल्डन रेसिडेन्सी धारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना 10 वर्षाचा रेजिडेन्सी व्हिसा देण्यात येईल.

नवीन गोल्डन व्हिसा धोरणाचे लक्ष्य
या अहवालात असे म्हटले गेले आहे की, या नवीन गोल्डन रेसिडेन्सी श्रेण्या युएईमध्ये करिअरच्या दृष्टीने नवीनता, सर्जनशीलता आणि उपयोजित संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी प्रोग्रामचा विस्तार करतात. या नवीन गोल्डन व्हिसा धोरणाचे उद्दीष्ट म्हणजे देशातील विविध क्षेत्रातील आणि शास्त्रीय विषयांतील तज्ञ आणि प्रतिभावान व्यावसायिकांना आकर्षित करणे आणि टिकवून ठेवणे हे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment