अजित पवारांनंतर आता अशोक चव्हाण यांचे कारखाने ईडीच्या रडारवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या ईडीच्या वतीने राजकीय नेत्यांना टार्गेट केले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशि संबंधित कारखान्यांवर छापा टाकल्यानंतर आता काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित कारखाने ईडीच्या रडारवर आले आहेत.

मंत्री अशोक चव्हाण यांच्या संबंधित साखर कारखान्यांना बुलढाणा अर्बन पतसंस्थेने कर्ज पुरवठा केलेला आहे. सध्या या पतसंस्थेची चौकशी आयकर विभागाकडून केली जात आहे. यात बुलढाणा अर्बन पतसंस्थेने किती कर्ज पुरवठा केला. यासह दिलेल्या कर्जाची आयकर पथकाकडून चौकशी सुरु आहे. बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी याविषयीची माहिती दिली आहे. बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयात बुधवारी आयकर विभागाच्या अकरा जणांच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली.

बुलढाणा अर्बन पतसंस्थेने अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील चार कारखान्यांना कर्ज दिले आहे. या चार कारखान्यांसंदर्भात ही चौकशी केली जात आहे. गेल्या २४ तासापासून पथक चौकशी करत आहेत. सुभाष शुगर हातगाव, एव व्ही शुगर उमरी आणि भाऊराव शुगर १, भाऊराव शुगर २ हे नांदेड येथील चार कारखाने आहेत. या कारखान्यांना दिलेल्या कर्जाशी संबंधित आयकर पथक चौकशी केली जात आहे.